




आमची माहिती...
नमस्कार! डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी भारतातील पहिली आयएसओ मानांकित संघटना म्हणजे रुग्ण हक्क परिषद होय. रुग्ण हक्क परिषदेची स्थापना सन- ०८ एप्रिल २०१४ रोजी संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. रुग्णांना मोफत उपचारांचा हक्क तथा अधिकार मिळालाच पाहिजे, यासाठीची जनमानसातील लोकप्रिय चळवळीतील संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषद सुप्रसिद्ध आहे.
रुग्ण हक्क परिषदेने ” कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान ” २०२५- २०२९ ही पाच वर्ष कॅन्सर रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी समर्पित केलेली आहेत. समाजातील कॅन्सरने घातलेले थैमान त्यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च मोफत करण्यासाठीच कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत महागडे उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख उमेश चव्हाण यांनी दिली.
कॅन्सरचे प्रकार
- स्तनाचा कॅन्सर
- तोंडाचा कॅन्सर
- अंडाशयाचा कॅन्सर
- पिशवीचा कॅन्सर
- जिभेचा कॅन्सर
- सर्व प्रकारचे कॅन्सर
कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत "मोफत उपचार - मोफत शस्त्रक्रिया" करिता...

- रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यालयीन कामकाज वेळेतच सर्वप्रथम फोन करून वेळ निश्चित करून घ्यावी.
- वेळ घेण्यासाठी 9850002204 आणि 9850002207 या क्रमांकावर फोन करावेत
- प्रत्यक्ष भेटण्यासाठी रुग्णाचे 2 फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, हॉस्पिटलचे इस्टिमेट, pet scan किंवा बायोप्सी केल्याची टेस्टचे पेपर, औषध किंवा गोळ्या हव्या असतील तर डॉक्टरांचे सही शिक्के असलेले प्रिस्क्रीप्शन ई. कागदपत्रा सह समक्ष भेटणे.
- रुग्ण हक्क परिषद कार्यालयातील स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते तुमच्याशी बोलतील, संवाद साधतील. तुमचे प्रश्न व अडचणी समजून घेतील.
- आपल्या कॅन्सर ग्रस्त रुग्णाला हवे असणारे उपचार जसे की, रुग्णाला ऍडमिट करून द्यावे लागणारे उपचार, रुग्णावर करावी लागणारी शस्त्रक्रिया, केमोथेरपी तसेच आपल्या रुग्णाला हवी असलेली औषधे इंजेक्शने संपूर्णता मोफत किंवा सवलतीच्याच दरात कसे मिळतील यासंबंधीचे मार्गदर्शन आपणांस करतील.
- उपचार केमोथेरपी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ ओंको फिजिशियन, अंको सर्जन डॉक्टरांची वेळ निश्चित करून रुग्णाच्या तपासणीसाठी जे शक्य असेल ते सर्व प्रयत्न करतील.
- मोफत किंवा स्वस्त आणि सवलतीच्या दारातील उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्व शासकीय योजना आणि विविध माध्यमातून येणारे आर्थिक स्त्रोत त्यासाठी लागणारी कागदपत्रे यासंबंधीचे मार्गदर्शन आपल्याला रुग्ण हक्क परिषद कार्यालयातून मिळेल
- युनिव्हर्सल हॉस्पिटल- शनिवार वाड्याजवळ, कसबा पेठ पुणे, होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर, एडी कॅम्प चौक, न्यू नाना पेठ, पुणे हरजीवन हॉस्पिटल, सारसबाग समोर, स्वारगेट पुणे
- या तीनही ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतील.
कर्करोगाचे प्रकार

जिभेचा कॅन्सर
तोंडाच्या कोणत्याही भागात कर्करोग विकसित होतो ज्यामध्ये जिभेचाही समावेश होतो.
जोखीम घटकांमध्ये तंबाखूचा वापर, जास्त मद्यपान, मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) संसर्ग आणि अनुवांशिक घटक यांचा समावेश आहे.

तोंडाचा कॅन्सर
तोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बाजुस होतो. गुटखा, सिगरेट वा तत्सम पदार्थांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.

अंडाशयाचा कॅन्सर
अंडाशयाचा कर्करोग हा बहुतांशवेळा चाळिशीनंतर वा रजोनिवृत्तीनंतर होतो. सुरुवातीची लक्षणं ही इतर सर्वसामान्य लक्षणांसारखीच असतात. पोट फुगल्यासारखं वाटणं, धाप लागणं, वारंवार लघवीला जावं लागणं,

पिशवीचा कॅन्सर
जेव्हा अंडाशयातील किंवा फॅलोपियन ट्यूबमधील असामान्य पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात तेव्हा गर्भाशयाचा कर्करोग सुरू होतो. स्त्री प्रजनन प्रणालीच्या इतर कर्करोगांच्या तुलनेत गर्भाशयाचा कर्करोग अधिक प्रचलित आहे आणि त्यामुळे जास्त मृत्यू होतात.

स्तनाचा कर्करोग
स्तनाच्या ऊतींमध्ये निर्माण होणारा कर्करोग.
स्तनाचा कर्करोग महिलांमध्ये होतो आणि पुरुषांमध्येही क्वचितच होतो.
स्तनाच्या कर्करोगाच्या लक्षणांमध्ये स्तनात गाठ, काखेत गाठ, स्तनात वेदना, स्तनाग्रातून रक्तस्त्राव आणि स्तनाग्र, स्तन किंवा स्तनावरील त्वचेच्या आकारात किंवा पोत बदल यांचा समावेश आहे.
रुग्णालयांची यादी

युनिव्हर्सल हॉस्पिटल, पुणे

होप हॉस्पिटल ऍड कॅन्सर सेंटर, पुणे

हरजिवन हॉस्पिटल, पुणे
रुग्णालयांची यादी

युनिव्हर्सल हॉस्पिटल, पुणे

होप हॉस्पिटल ऍड कॅन्सर सेंटर, पुणे

हरजिवन हॉस्पिटल, पुणे
औषधे
महाराष्ट्र मेडिकल्स मध्ये कॅन्सर वरील उपचारांचे सर्व औषध उपलब्ध आहेत.
सर्व औषधे कमी दरात उपलब्ध करून मिळतील आणि 24/ 7 सेवा उपलब्ध आहे.
मनोगत

कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख तथा रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष - उमेश चव्हाण
संपर्क
९८५०००२२०४ / ९८५०००२२०७
या क्रमांकावर संपर्क साधावा.
९८५०००२२०७ / ९८५०००२२०४
या क्रमांकावर संपर्क साधावा.